गाणी

जो जो जो जो रे रघुराया ।

पारंपरिक मराठी पाळणा.

जो जो जो जो रे रघुराया । निद्रा करिं बा सखया ॥
जोगी आलासे भेटाया । शशिसम देखुनि काया ॥बा०जो०॥
जोगी दिसतो सुंदर । मस्तकीं जटाभार ॥
गळां रुंडमाळांचे हार । शोभे व्याघ्रांबर ॥बा०जो०॥१॥
भस्म चर्चूनि सर्वांगीं । वेष्‍टिला भुजंगीं ॥
भूतें घेऊनियां स्वअंगीं । आला प्रेमरंगीं ॥बा०जो०॥२॥
जटेमधुनियां जळ वाहे । मुद्रा लावुनि पाहे ॥
मान धरुनियां तो राहे । नकळे कोण आहे ॥बा०जो०॥३॥
इतुकें ऐकुनियां वचन । हांसले रघुनंदन ॥
भावें पदकमळीं तल्लीन । गोसावीनंदन ॥बा०जो०॥४॥

या पाळण्यात सांगितले आहे. रे रघुराया , निद्रा करिं बा सखया गी आलासे भेटाया , शशिसम देखुनि काया बा० गी दिसतो सुंदर , मस्तकीं जटाभार गळां रुंडमाळांचे हार , शोभे व्याघ्रांबर बा०. पुढे भस्म चर्चूनि सर्वांगीं , वेष्‍टिला भुजंगीं भूतें घेऊनियां स्वअंगीं , आला प्रेमरंगीं बा०. शेवटी इतुकें ऐकुनियां वचन , हांसले रघुनंदन भावें पदकमळीं तल्लीन , गोसावीनंदन बा०.

- पारंपरिक