जो जो जो जो रे त्रिनयना । निज बा पंचानना ।
सृष्टीसंहार तमोगुणा । भोळ्या निर्मळ मना ॥ध्रु०॥
सृष्टी संहार तुज तेणें । बहु झालीं जागरणें ।
तो भ्रम सांडूनियां त्वां देणें । निजीं निजसुख घेणें ॥जो०१॥
भिक्षाटण करिताम अवधूता । श्रमलासी बहु फिरतां ।
सोडुनि निजकांता त्वां वसतां । केला डोंगर माथा ॥जो०२॥
ऐसा बैरागी निःसंगी । होतासी तूं जोगी ।
तो तूं स्त्रीलागीं अर्धांगी । घेऊन फिरसी जगीं ॥जो जो॥३॥
अहा त्वां कैसें तप केलें । तुज भिल्लीनें भुलवीलें ।
बाळपणासी धरियेलें । बायलेच्यानि बोले ॥जो जो०॥४॥
ऐसा निलाजरा तूं अससी । शंका नाहीं तुजसी ।
किती रे सांगावें तुजपाशीं । त्र्यंबक प्रभु सुखराशी ॥जो०५॥
या पाळण्यात सांगितले आहे. रे त्रिनयना , निज बा पंचानना , सृष्टीसंहार तमोगुणा , भोळ्या निर्मळ मना ध्रु० सृष्टी संहार तुज तेणें , बहु झालीं जागरणें , तो भ्रम सांडूनियां त्वां देणें , निजीं निजसुख घेणें १ भिक्षाटण करिताम अवधूता , श्रमलासी बहु फिरतां , सोडुनि निजकांता त्वां वसतां , केला डोंगर माथा २ ऐसा बैरागी निःसंगी , होतासी तूं गी , तो तूं स्त्रीलागीं अर्धांगी , घेऊन फिरसी जगीं. पुढे अहा त्वां कैसें तप केलें , तुज भिल्लीनें भुलवीलें , बा.
- पारंपरिक