गाणी

रजनीमाईचा पाळणा

पारंपरिक मराठी पाळणा.

बाळा जो जो अंगाई । गाई रजनी माई ॥धृ॥
निजली सारी रानपाखरे
गाती निर्झर, गाती वारे
गाती दिशाही दाही, बाळा जो जो अंगाई ॥१॥
आकाशामधी शब्दावांचुनि
यक्ष यक्षिणी गाती गाणी
लहर तरंगत येई , बाळा जो जो अंगाई ॥२॥
सुबक रुपेरी तुझा पाळाणा
नक्षत्रांच्या राघू मैना
छतास जडल्या पाहा, बाळा जो जो अंगाई ॥३॥
हंसरा राजस माझा राणा
कुणा दिसेना कधि रडताना
दृष्ट न होवो बाई , बाळा जो जो अंगाई ॥४॥

या पाळण्यात सांगितले आहे. बाळा अंगाई , गाई रजनी माई निजली सारी रानपाखरे गाती निर्झर, गाती वारे गाती दिशाही दाही, बाळा अंगाई. पुढे आकाशामधी शब्दावांचुनि यक्ष यक्षिणी गाती गाणी लहर तरंगत येई , बाळा अंगाई. शेवटी हंसरा राजस माझा राणा कुणा दिसेना कधि रडताना दृष्ट न होवो बाई , बाळा अंगाई.

- पारंपरिक