गाणी

विष्णूचा पाळणा

पारंपरिक मराठी पाळणा.

जो जो जो जो रे व्यापका । सृष्टीच्या पालका ।
निज निज निज बा तू बालका । तान्हुल्या सात्विका ॥धृ॥
धावसि दासाच्या संकटाला । म्हणवुनि श्रमली काया ।
श्रम सांडुनिया निज ध्येया । हलविते पाळणिया ॥१॥
शीते व्यापिले तुज भारी । निजता सागर जठरी ।
आला काळीमा शरीरी । फणिवर धुधु:कारी ॥२॥
अद्‍भुत तव महिमा श्रुतिनिगमा । न कळे तुझी सीमा ।
तो तू स्त्रीकामा घनश्‍यामा । अंतरी धरुनी कामा ॥३॥
तुजला कैसी बा लाज नसे । कैसे झाले पिसे ।
त्र्यंबक प्रभु विनवी तुज बहुसे । येत असे रे हासे ॥ जो जो ॥४॥

या पाळण्यात सांगितले आहे. रे व्यापका , सृष्टीच्या पालका , निज निज निज बा तू बालका , तान्हुल्या सात्विका धावसि दासाच्या संकटाला , म्हणवुनि श्रमली काया , श्रम सांडुनिया निज ध्येया , हलविते पाळणिया. पुढे शीते व्यापिले तुज भारी , निजता सागर जठरी , आला काळीमा शरीरी , फणिवर धुधु:कारी. शेवटी तुजला कैसी बा लाज नसे , कैसे झाले पिसे , त्र्यंबक प्रभु विनवी तुज बहुसे , येत असे रे हासे.

- पारंपरिक