ओवी

अरे संसार संसार

संसाराची ओवी.

अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तव्हा मियते भाकर

अरे संसार संसार
खोटा कधी म्हनू नहीं
राऊळच्या कळसाले
लोटा कधी म्हनू नहीं

अरे संसार संसार
नहीं रडन कुढन
येड्या, गयातला हार
म्हनू नको रे लोढन

अरे संसार संसार
खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधि कडू
बाकी अवघा लागे गोड

अरे संसार संसार
म्हनू नको रे भिलावा
त्याले गोड भिमफूल
मधि गोडम्ब्याचा ठेवा

देखा संसार संसार
शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे
मधी चिकने सागरगोटे

ऐका, संसार संसार
दोन्ही जीवाचा ईचार
देतो दुःखाले होकार
अन सुखाले नकार

देखा संसार संसार
दोन्ही जीवाचा सुधार
कधी नगद उधार
सुखा दुःखाचा बेपार

अरे संसार संसार
असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर
त्याच्यावरती मदार

असा संसार संसार
आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार
मंग जीवाचा आधार

बहिणाबाई संसाराला चुलीवरच्या तव्यासारखा म्हणतात. आधी हाताला चटके बसतात, मग भाकर मिळते. तो खोटा नाही, आणि देवाच्या कळसाला लोटा म्हणता येत नाही. रडून कुढून गळ्यातला हार लोढा होत नाही. खीर तोडला की एक घास कडू लागतो, बाकी सारा गोड. भीलावाला गोड भीमफूल आहे, आणि आत गोडंब्याचा ठेवा आहे. शेंग बाहेर काटेरी असते, आत सागरगोटे चिकणे असतात. दोन्ही जीवांचा विचार असा आहे की दुःखाला होकार मिळतो आणि सुखाला नकार. सुखदुःखाचा हा बाजार कधी नगद चालतो, कधी उधार. संसार जादूगार आहे, जीवाचा मंत्र त्याच्यावर आहे. आधी देवाचा इशारा येतो, मग दैवाचा जोर, आणि शेवटी जीवाचा आधार.

- बहिणाबाई चौधरी