जीव देवानं धाडला जल्म म्हणे 'आला आला'
जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे 'गेला गेला'
दीस गेला कामामधी रात नीजमधी गेली
मरणाची नीज जाता जलमाची जाग आली
नही सरलं सरलं जीव तुझ येन जान
जसा घडला मुक्काम त्याले म्हनती रे जीन
आला सास, गेला सास जीव तुझं रे तंतर
अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!
येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
काम करता करता देख देवाजीच रूप
ऐक ऐक माझ्या जीवा पीडयेलाच कण्हणं?
देरे गांजल्याले हात त्याच ऐक रे म्हनन
अरे निमानतोंडयाच्या वढ पाठीवर्हे धांडा
नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालझेंडा
हास हास माझ्या जीवा असा संसारात हास
इडा पीडा संकटाच्या तोंडावर्हे काय फास
जग जग माझ्या जीवा असा जगणं तोलाचं
उच्च गगनासारख धरीत्रीच्या रे मोलाचं
देवाने जीव धाडला. जन्म म्हणतो, आला आला. बोलावणे आले की मौत म्हणते, गेला गेला. दिवस कामात गेला, रात्र निजेत गेली. मरणाची निज जाते आणि जन्माची जाग येते. जीव सरत नाही, येणजाण चालू आहे. मुक्काम घडला त्याला जीवन म्हणतात. श्वास आला आणि गेला. जगणे आणि मरणे एका श्वासाचे अंतर आहे. जीवा, काम अमाप पडले आहे. काम करता करता देवाचे रूप पहा. पीडा कळव, गांजलेल्याला हात दे. पाठीवर ओझे घेऊन नाच, संसाराचा झेंडा झेल. संसारात हस, संकटांच्या तोंडावर फास काय. जगणे तोलाचे आहे, आकाशाइतके उंच आणि धरतीइतके मोलाचे.
- बहिणाबाई चौधरी