सवाई जानराव धुळप मोहरा विजयदुर्गाला जी ॥ नित्य वाजतो चौघडा खाशा वाडयाला जी ॥धृ.॥ या तळे कोंकणामधि राव आंगरा होता जी ॥ त्याणें विजयदुर्गाचा पाया घातला जी ॥ ह्या कणक्या गोव्या पति सारंग दुर्गाला जी ॥ दुरुन कोट हा दिसतो जंजिरा जी ॥१॥
ह्या किल्याची सांगतो मात घ्या ऐकून जी ॥ हा विजयदुर्ग पिंजरा दिसे त्रिभुवनी शोभिवंत जी ॥ ऐक अख्या केली रुद्राजीराव धुळपाने जी ॥ चोही बंदरी धाक लाविला भल्या मर्दाने जी ॥२॥
रामलिंगाची दया धुळपरायाला जी ॥ त्याने आरमाराचा सुभा दिला तयाला जी ॥ पुढे चालती बैरगी जरीपटका आघाडीला जी ॥ दोन ढाला शिरी बांधिला मंदिल जरी पटका जी ॥ डोईवर छत्र दिसे राज मोहरा जी ॥ असा रामलक्ष्मणाचा जोडा दोघांचा जी ॥३॥
हरबाजीरावाचे कुळीं दीप लागला असे जी । जसे काशीमध्यें सुर्यबिंब उगवला जी ॥ त्याने आरमाराचे तोफेचा भडिमार केला जी ॥ लोकाला साखर वाटली आनंदानें जी ॥ बापू गीरकर शेवक गातो सभेला जी ॥ डफावर लाविला कलगी भगवा फरारा जी ॥४॥
या पोवाड्यात सांगितले आहे. सवाई जानराव धुळप मोहरा विजयदुर्गाला जी नित्य वाजतो चौघडा खाशा वाडयाला जी या तळे कोंकणामधि राव आंगरा होता जी त्याणें विजयदुर्गाचा पाया घातला जी ह्या कणक्या गोव्या पति सारंग दुर्गाला जी दुरुन कोट हा दिसतो जंजिरा जी. पुढे ह्या किल्याची सांगतो मात घ्या ऐकून जी हा विजयदुर्ग पिंजरा दिसे त्रिभुवनी शोभिवंत जी ऐक अख्या केली रुद्राजीराव धुळपाने जी चोही बंदरी धाक लाविला भल्या मर्दाने जी. शेवटी हरबाजीरावाचे कुळीं दीप लागला अस.
- पारंपरिक