सवाई माधवराव पेशवे सवाई चढती राज्याला । परशुराम अवतार पुरंदरी ज्यांचा जन्म झाला ॥ध्रुपद॥
सप्तदीप नवखंड पृथ्वी दहावा खंडा ऐका काशी । भरतखंडामधिं एक जंबुद्वीप आहे दक्षिणदेशीं ॥ साडेसहा सुभे राज्य दक्षणचें आहे शाहुमहाराजाशीं । देशोदेशिंच्या खंडण्या धाडुनि देती पुंडमवासी ॥ केवढा दर्प थरथर कांपे धासत वैर्याला । देशोदेशिंचे वकिल हमेशा पडले शहरपुण्याला ॥सवाई०॥ ॥१॥
मध्यान्हीं इंदुवार सप्तमी सोळाच घटका समयाला ॥ देशोदेशीं साखरा वांटीच्या आनंद झाला सृष्टीला ॥ सुटती तोफा एक कडाका गणीत नाहीं वाद्यांला । सडे घालती उत्तम आंगणिं सर्व मिळुनि त्या समयाला ॥सवाई०॥ ॥२॥
मौंजीबंधन लग्न रायाचें खूप रायाचें झालें घणघोरा । आरशाचे मंडप रेखिले चित्रशाळा अपार ॥ जरी बादले खांब चांदवे सोगा झाला चौफेर । तक्त रायाचें पुढें चालतें रथ हत्तींचा बिनीवर ॥ दोही रस्त्यानें चिराकदानी इंद्रसभेचा दाखला । चतुराई नानाची कुठवर उपमा द्यावी तयाला ॥सवाई०॥ ॥३॥
आणले भोंसले, मोगल, महाराज छत्रपती । शाण्णव कुळीचे भूप मिळाले सांगाया झाल्या कृती ॥ महादेव बोलला सवाई शास्त्र चढले वेदाला । खंडू संतू म्हणे पुण्यामधिं पोवाडा हा त्यानें केला ॥सवाई०॥ ॥४॥
या पोवाड्यात सांगितले आहे. सवाई माधवराव पेशवे सवाई चढती राज्याला , परशुराम अवतार पुरंदरी ज्यांचा जन्म झाला ध्रुपद सप्तदीप नवखंड पृथ्वी दहावा खंडा ऐका काशी , भरतखंडामधिं एक जंबुद्वीप आहे दक्षिणदेशीं साडेसहा सुभे राज्य दक्षणचें आहे शाहुमहाराजाशीं , देशोदेशिंच्या खंडण्या धाडुनि देती पुंडमवासी केवढा दर्प थरथर कांपे धासत वैर्याला , देशोदेशिंचे वकिल हमेशा पडले शहरपुण्याला सवाई०. पुढे मध्यान्हीं इंदुवार सप्तमी सोळाच घटका समयाला देशोदेशीं साखरा वा.
- पारंपरिक