गाणी

रावणा मारून माझे माये गे

नामदेवांचा पाळणा.

रावणा मारून माझे माये गे । बिभीषण लंकेस स्थापिलास कायगे । अयोध्येसी आलीस कायगे ।
माझे ह्रदयमंदिरीं राहेंगे । विठ्ठल मायगे ॥१॥
रुसुनी आली रखुमाबाईगे । तिच्या मागें तूं धांवलीस कायगे ।
संगें घेऊनियां गोपाळ गायगे । मम ह्रदयमंदिरीं राहेंगे ॥२॥
सत्ये राधिकेचे पायींगे । सोडूनी द्वारकेचा ठावगे ।
आलीस कायगे । माझे ह्रदयमंदिरीं राहेंगे ॥३॥
धन्य पुंढलीक भक्त मायगे । त्याणें विटेवर उभा केला कायगे ।
नामा म्हणे माझे मायगे । माझे ह्रदय-मंदिरा राहेंगे ॥४॥

या पाळण्यात सांगितले आहे. रावणा मारून माझे माये गे , बिभीषण लंकेस स्थापिलास कायगे , अयोध्येसी आलीस कायगे , माझे ह्रदयमंदिरीं राहेंगे , विठ्ठल मायगे. पुढे रुसुनी आली रखुमाबाईगे , तिच्या मागें तूं धांवलीस कायगे , संगें घेऊनियां गोपाळ गायगे , मम ह्रदयमंदिरीं राहेंगे. शेवटी धन्य पुंढलीक भक्त मायगे , त्याणें विटेवर उभा केला कायगे , नामा म्हणे माझे मायगे , माझे ह्रदय-मंदिरा राहेंगे.

- संत नामदेव