म्हणी

भाग ३

म्हणी १०१–१५०

कावळा बसला आणि फांदी तुटली

दोन गोष्टी एकत्र पण संबंध नसणे.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

नीच व्यक्तीच्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नाही.

कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे

स्वतःची अवस्था जगावर लादून बघणे.

कुंपणाने शेत खाल्ले

रक्षण करणाराच नुकसान करतो.

कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा

एखाद्याच्या ताब्यात गेल्यावर आपलेपण गमावलेला माणूस.

कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी वाकडीच

मूळ स्वभाव सहज बदलत नाही.

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ

आपल्याच माणसाने आपले नुकसान करणे.

कुसंतानापेक्षा निसंतान बरे

वाईट पुत्र असण्यापेक्षा पुत्र नसणे चांगले.

केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले

फायदा घेताना आनंद, पण मोबदला देताना त्रास होणे.

केळीला नारळी, घर चंद्रमौळी

अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे.

केस उपटल्याने का मढे हलके होते

मोठ्या समस्येसाठी क्षुल्लक उपाय उपयोगी ठरत नाहीत.

कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी

महान आणि क्षुल्लक गोष्टींची तुलना करणे.

कोणाच्या गाई म्हशी, कोणाला उठा बशी

चूक एकाची, पण शिक्षा दुसऱ्याला मिळणे.

कोल्हा काकडीला राजी

क्षुद्र माणसे शुल्लक गोष्टीने संतोष होतात.

कोल्ह्याला द्राक्ष आंबट

न मिळालेली वस्तू वाईट ठरवणे.

कोळसा उगाळावा तितका काळाच

वाईट गोष्ट कितीही सुधारली तरी वाईटच.

खर्चणाऱ्याचे खर्चते कोठावळ्याचे पोट दुखते

खर्च करणाऱ्याचा खर्च होतो, पण दुसराच त्याबद्दल कुरकुर करतो.

खऱ्याला मरण नाही

सत्य कधीच लपून राहत नाही.

खाई त्याला खवखवे

अपराधी व्यक्ती मनात अस्वस्थ असते.

खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी

चांगलेच हवे; न मिळाले तर नको.

खाऊ जाणे तो पचवू जाणे

मिळवण्याची ताकद असेल तर परिणामही सोसावा.

खाऊन माजावे टाकून माजू नये

संपत्तीचा योग्य वापर करावा उधळू नये.

खान तशी माती

आई-वडिलांप्रमाणेच मुलांचे वर्तन असते.

खायला काळ भुईला भार

निकामी माणूस सर्वांना ओझे होतो.

खोट्याच्या कपाळी गोटा

खोटेपणा करणाऱ्यांचे नुकसानच होते किंवा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसानच होते.

ग ची बाधा झाली

गर्व चढणे; अहंकार निर्माण होणे.

गरज सरो वैद्य मरो

गरज संपल्यावर मदत करणाऱ्याची पर्वा नसते.

गरजवंताला अक्कल नसते

अत्यंत गरजेच्या वेळी माणूस विचारशक्ती गमावतो.

गरजवंताला अक्कल येते

गरज पडली की माणूस शहाणा होतो.

गरजेल तो पडेल काय

केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून काही घडत नाही.

गर्वाचे घर खाली

गर्वाचा परिणाम अपमानात होतो.

गळा कापला खोकला गेला

मोर्चा दुखापेक्षा त्याच्या निवारणाचाच उपाय भयंकर असतो.

गळ्यात पडले झुंड, हसून केले गोड

परिस्थिती टाळता येत नसेल तर ती हसत स्वीकारावी.

गळ्यातले तुटले ओटीत पडले

नुकसान होतानाही काहीतरी वाचणे.

गाड्याबरोबर नळ्याची यात्रा

मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा.

गाढवाचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ

मूर्खांच्या समूहात फक्त भांडणच होते.

गाढवाच्या पाठीवर गोणी

गोष्टींचा उपयोग कळला नाही तर त्या निरुपयोगी ठरतात.

गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता

अज्ञानी माणसाला उपदेश व्यर्थ असतो.

गाढवाला गुळाची चव काय

मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.

गाता गळा शिकता मळा

सरावानेच प्रावीण्य येते.

गाय व्याली, शिंगी झाली

अकल्पित घटना घडणे.

गाव करी ते राव न करी

सामान्य लोक एकीने जे करू शकतात ते श्रीमंत कधीच करू शकत नाहीत.

गावंढळ गावात गाढवीन सवाष्ण

मूर्खांत थोडे ज्ञान असलेला शहाणा.

गुरुची विद्या गुरुलाच फळली

एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.

गोगलगाय नि पोटात पाय

बाहेरून शांत दिसणारी, पण आतून कपट असणारी व्यक्ती.

घडाई परिस मडाई जास्त

मुख्य गोष्टीपेक्षा आनुषंगिक गोष्टींवर जास्त खर्च होणे.

घर ना दार देवळी बिर्हाड

शिरावर जबाबदारी नसणे.

घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे

अडचणीत आणखी भर पडणे.

घरोघरी मातीच्या चुली

सर्वत्र सारखीच सामान्य परिस्थिती असणे.

घेता दिवाळी देता शिमगा

घ्यायला आनंद, पण द्यायची वेळ आली की बोंबाबोंब.