घोडे कमावते आणि गाढव खाते
एकाने कष्ट करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
चार जणांची आई बाजारात जाई
जबाबदारी अनेकांची असेल तर कोणीच काळजी घेत नाही.
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
सत्ता किंवा अनुकूल वेळ कायम कोणाकडेच राहत नाही.
चालत्या गाडीला खीळ
व्यवस्थित चालणाऱ्या कामात अडथळा निर्माण होणे.
चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतले
स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे.
चुलीपुढे शिपाई, अन घराबाहेर भागुबाई
घरात शूरपणा दाखवायचा पण बाहेर मात्र घाबरायचे.
चोर सोडून संन्याशालाच फाशी
खऱ्या गुन्हेगाराला सोडून निरपराधाला शिक्षा देणे.
चोरांच्या हातची लंगोटी
ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते, त्याच्याकडून थोडेफार मिळणे.
चोराची पावली चोराला ठाऊक
वाईट माणसालाच वाईट युक्त्या कळतात.
चोराच्या उलट्या बोंबा
स्वतः चुकी करून दुसऱ्यावर दोष ठेवणे.
चोराच्या मनात चांदणे
वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीस येईल की काय, अशी सतत भीती असते.
चोरावर मोर
एखाद्या गोष्टीत दुसऱ्याला वरचढ ठरणे.
छत्तीसाचा आकडा
विरुद्ध मत असणे.
जळते घर भाड्याने कोण घेते
नुकसान स्पष्ट दिसताना कोण स्वीकारेल.
जळे आणि हनुमान बेंबी चोळे
दुसऱ्याचे नुकसान करून स्वतः मात्र नामानिराळे राहणे.
जशी कुडी तशी पुडी
देह / कुवतीनुसार आहार.
जारात तुरी, भट भटणीला मारी
काल्पनिक गोष्टीवरून भांडण करणे.
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे
दुसऱ्याच्या स्थितीत आपण गेल्यावरच त्याची खरी जाणीव होते.
जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही
सवय / स्वभाव सहज सुटत नाही.
जी खोड बाळा ती जन्म काळा
जन्मजात स्वभाव जन्मभर जात नाही.
जुने ते सोने
जुने अनेकदा चांगले असते.
जे न देखे रवि, ते देखे कवी
जे सूर्यही पाहू शकत नाहीत, ते कवी आपल्या कल्पनेने पाहतो.
जो गुळाने मरतो त्याला विष कशास
जिथे गोड बोलून काम होते तिथे कठोर उपायांची गरज नसते.
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी
एकाच स्वभावाचे माणसे एकमेकांना चांगले ओळखतात, त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा निरर्थक ठरते.
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी
आपल्यावर उपकार करणाऱ्याचे गुणगान करावे.
ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे
एखाद्याचे भले करायला गेलं तर तोच विरोध करतो.
ज्याचे जळे त्याला कळे
जो स्वतः अनुभवतो त्यालाच खरे दुःख कळते.
ज्याच्या हाती ससा, तो पारधी
एखाद्याचे कर्तृत्व दुसऱ्याच्या नावे गाजणे.
झाकली मूठ सव्वा लाखाची
मौन पाळून अब्रू राखणे.
झाड पाहावं फळांवरून
कृती आणि परिणामावरून व्यक्ती ओळखावी.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव येत नाही
त्रास सहन केल्याशिवाय मोठेपण येत नाही.
डोंगर पोखरुन उंदीर काढणे
कष्ट फार लाभ कमी.
डोंगराला धक्का दिला उंदीर निघाला
मोठ्या प्रयत्नातून फार छोटे परिणाम मिळणे.
डोळ्यात केर आणि कानात फुंकर
एके ठिकाणी उणीव असते परंतु दुसऱ्याच ठिकाणी उपाय करणे अशी हास्यास्पद कृती.
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला
वाईट संगतीमुळे चांगला माणूसही बिघडतो.
ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा
वाईट संगतीचे वाईटच परिणाम होतात.
तट्टाला टूमणी, तेजीला इशारत
मूर्खाला शिक्षा करूनही समजत नाही; शहाण्याला मात्र इशाऱ्यानेच कळते.
तरण्याचे कोळसे, म्हाताऱ्याला बाळसे
अगदी उलट गुणधर्म दिसणे.
तळे राखील तो पाणी चाखील
ज्याच्याकडे जबाबदारी दिली जाते, तो त्यातून काही ना काही फायदा करून घेतो.
तहान लागल्यावर विहीर खणणे
गरज पडली तेव्हाच उपाय शोधणे.
तापल्या तव्यावर भाकरी भाजून घ्यावी
सर्वसाधारण सामग्रीची अनुकूलता असताना आपले इष्ट कार्य साधून घ्यावे.
तितका संताप
कामाचा पसारा जितका मोठा तितकी जबाबदारी अधिक असणे.
ती हळद नि हो गोरी
कृत्याचा त्वरित लाभ मिळावा अशी अपेक्षा.
तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही
एक गोष्ट मिळाली की दुसरी मिळत नाही; सर्व अनुकूल गोष्टी एकत्र येत नाहीत.