म्हणी

भाग ६

म्हणी २५१–३००

न देवाय न धर्माय

देवाच्या कार्याला नव्हे आणि धर्माच्या कार्याला नव्हे.

न भूतो न भविष्यती

पूर्वी झाली नाही आणि पुढेही होणार नाही अशी घटना.

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने

दोषयुक्त कामात अडचणी सतत येतात.

नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये

परिस्थितीशी जुळवून घ्यावे पण नाराजी पत्करू नये.

नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये

प्रत्येकाच्या आरंभात काहीतरी दोष असतोच.

नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे

केलेला उपदेश किंवा प्रयत्न निष्फळ ठरणे.

नाकाचा बाल

अत्यंत प्रिय व्यक्ती.

नाकापेक्षा मोती जड

मालकापेक्षा नोकर शिरजोर.

नाग दाबले की तोंड उघडते

पेचात अडकविल्याशिवाय कबूल होत नाही.

नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला

आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाऊन उपयोग न होणे.

नागीण पोसली आणि पोसणारालाच डसली

वाईट माणसाला जवळ ठेवले तर तो शेवटी आपल्यालाच हानी पोहोचवतो.

नागेश्वराला नागवन सोमेश्वरा वात लावणे

एखाद्याला लुटून दुसऱ्याची भर करणे.

नाचता येईना अंगण वाकडे

काम येत नसताना स्वतःचा उणेपणा झाकून परिस्थितीला / दुसऱ्याला दोष देणे.

नाही पण जण्याची तरी असावी

चुकीचे कृत्य करताना समाज काय म्हणेल, याचा विचार करावा.

निंदकाचे घर असावे शेजारी

निंदा करणाराही उपयोगी पडतो.

नेसेन तर पैठणीच नेसेन, नाही तर नागवी बसेन

हट्ट व अट्टहासाने वागणे.

पडलेले शेण माती घेऊन उठते

एकदा चारित्र्यावर डाग लागला की तो पूर्ण नाहीसा होत नाही.

पदरी पडले पवित्र झाले

स्वीकारलेल्या बाबीला नावे न ठेवता समाधान.

पळसाला पाने तीनच

कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव तोच.

पाचमुखी परमेश्वर

बहुसंख्य लोक जे म्हणतात तेच खरे मानले जाते.

पाचही बोटे सारखी नसतात

प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो.

पाण्यात राहून माशाशी वैर कशाला

ज्यांच्या सोबत राहायचे त्यांच्याशी शत्रुत्व करू नये.

पाप आढ्यावर बोंबलते

पाप लपवले तरी उघड होतेच.

पाय धु तर म्हणे तोडे केवढ्याचे

आपले काम सोडून नको त्या चौकशा करणे.

पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम

मोठे शांत राहतात; लहान मात्र बडेजाव करतात.

पायाची वाहन पायीच बरी

मूर्खाला सन्मान दिला तर तो उर्मट होतो.

पायीची वहाण पायी बरी

योग्यतेप्रमाणे वागवावे.

पालथ्या घड्यावर पाणी

केलेला उपदेश वाया जाणे.

पाहुनी आली आणि म्होतूर लावून गेली

पाहुणे येऊन नुकसान करून जाणे.

पुढच्याच ठेच, मागचा शहाणा

दुसऱ्याच्या अनुभवावरून सावध राहणे.

पुढे तिखट मागे पोचट

वरकरणी प्रभावी पण प्रत्यक्षात निष्फळ.

पुत्र मागण्यास गेली, भ्रतार घालवून आली

फायदा व्हावा म्हणून गेले, पण उलट नुकसान झाले.

पुराणातील वांगी पुराणात

उपदेशाप्रमाणे वर्तन नसणे.

पेरावे तसे उगवते

जसे कर्म तसे फळ.

पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा

पैसा कमी, पण काम जास्त.

पोट भरे खोटे चाले

पोट भरल्यावर माणूस खोटे बोलू लागतो किंवा फुगून जातो.

पोटी कस्तुरी, वासासाठी फिरे भिरीभिरी

स्वतःजवळच असलेली गोष्ट दुसरीकडे शोधणे.

पोर होईल ना, व सवत साहिना

स्वतः काही करीत नाही, आणि दुसऱ्यालाही करू देत नाही.

प्रयत्नांती परमेश्वर

सतत प्रयत्न केल्यास यश मिळते.

फार झाले हसू आले

अतिरेक झाल्यास गोष्ट अंगवणी पडते.

फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय

सत्ताधाऱ्याचा निर्णय अंतिम असतो, तो अन्यायकारक असला तरी मानावा लागतो.

फुकटचे घोडे खायला कशाला नाही

फुकट मिळणारी गोष्ट कोणालाही नको वाटत नाही.

फुटका डोळा काजळाने साजरा करावा

दोष झाकता न येत नसल्यास तो शक्य तितका लपवावा.

फुल ना फुलाची पाकळी

अपेक्षित तेवढे न देता अत्यल्प देणे.