म्हणी

भाग ८

म्हणी ३५१–४००

यथा राजा तथा प्रजा

प्रमुखाच्या वर्तनाचा इतरांवर प्रभाव पडतो.

या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे

बनवाबनवी करणे.

या हाताचे त्या हातावर

वाईट कृत्याचे फळ लवकर मिळते.

ये रे कुत्र्या, खा माझा पाय

आपण होऊन संकट ओढवून घेणे.

येरे माझ्या मागल्या आणि ताक ,कण्या चांगल्या

एखाद्याने केलेला उपदेश व्यर्थ ठरवून पुन्हा पूर्वीप्रमाणेच वागणे.

रंग जाणे रंगारी

ज्याची विद्या त्यालाच माहीत.

रडत राऊत, रडत राव घोड्यावर स्वार

इच्छा नसतानाही जबाबदारी अंगावर पडणे.

राईचा पर्वत करणे

क्षुल्लक गोष्ट मोठी करून सांगणे.

राजाला दिवाळी काय माहित

ज्याच्या घरी नेहमीच उत्सव त्याला सणाचे महत्त्व काय?.

राज्याचे घोडे आणि खासदार उडे

वस्तू एकाची, फायदा दुसऱ्याचा.

रात्र थोडी सोंगे फार

कामे पुष्कळ आणि वेळ कमी असणे.

रामाशिवाय रामायण, कृष्णाशिवाय महाभारत

मुख्य गोष्टीचा अभाव.

रोज मरे त्याला कोण रडे

वारंवार घडणाऱ्या गोष्टीविषयी स्वारस्य उरत नाही.

लंकेंत सोन्याच्या विटा

दुसरीकडे असलेल्या फायद्याचा उपयोग नाही.

लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही

धाका शिवाय शिस्त नाही.

लग्नाला गेली आणि बारशाला आली

अतिशय उशिराने पोहोचणे.

लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस

गौण कार्यावर खर्च जास्त, मुख्य कार्य कमी.

लष्कराच्या भाकऱ्या भाजणे

फायदा नसलेला निरुपयोगी उद्योग.

लहान तोंडी मोठा घास

योग्यता नसताना मोठा दावा करणे.

लाज नाही मना कोणी काही म्हणा

आपल्यावर दुसरा कितीही टीका करू त्याची निर्लज्ज माणसाला परवा नसते.

लाथ मारेल तिथे पाणी काढील

पराक्रमी माणूस अवघड ठिकाणीही यश मिळवतो.

लेकी बोले सुने लागे

एखाद्याला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.

लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण

इतरांना उपदेश, स्वतः वागण्यात बदल नाही.

वडाची साल पिंपळाला

एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलले.

वड्याचे तेल वांग्यावर

एखाद्याबद्दल दुसऱ्याला दोष देणे.

वराती मागून घोडे

काम पूर्ण झाल्यावर मदतीस येणे.

वळणाचे पाणी वळणावर जाणार

निसर्गानुसार जे घडायचे ते घडते.

वाघ आला रे आला

खोटे बोलल्यामुळे खरे सांगितले तरी विश्वास बसत नाही.

वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच

वाईट व्यक्तीला नावाने फरक पडत नाही.

वारा पाहून पाठ फिरवावी

परिस्थिती पाहून वागावे.

वासरात लंगडी गाय शहाणी

सुज्ञ माणसात थोडेसे ज्ञान असलेला शहाणा ठरतो.

वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावा

सर्व साधने आणि काळ अनुकूल असेल तर त्यात आपला फायदा करून घ्यावा.

विंचवाचे बिर्हाड पाटीवर

गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे.

विचाराची तूट तेथे भाषणाला उत

मूर्खांच्या गर्दीत बडबड भरपूर असते.

विशी विद्या तिशी धन

योग्य वेळेत योग्य काम केल्यास कर्तुत्व दिसते.

विश्वासही ठेवला घरी, चारी सुना गरवार करी

विश्वासघात होणे.

वेळ पडली की गाढवाला बाप म्हणावे

गरज पडली की कोणालाही मान द्यावा लागतो.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती

जितकी माणसे तितके स्वभाव.

शंभर दिवस चोराचे एक दिवस सावकाराचे

वाईट कृत्य करणारा शेवटी पकडला जातो.

शहाण्याला शब्दांचा मार

सुज्ञ माणूस सूचना देऊनही सुधारतो.

शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले

एकाचे नुकसान दुसऱ्याचा फायदा.

शितावरून भाताची परीक्षा

लहानशा भागावरून संपूर्ण गोष्टीचा अंदाज.

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी

चांगल्या माणसापासून चांगल्या गोष्टी मिळतात.

शुभस्य शीघ्रम

चांगली गोष्ट ताबडतोब करावी.

शेंडी तुटो की पारंबी तुटो

दृढ निश्चय करणे.

शेजी देईल काय आणि मन धायेल काय

शेजारी केलेले उपकार मनाला तृप्ती देत नाही.

शेजीबाईची कढी, धावधाव वाढी

एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखवणे.

शेरास सव्वाशेर

सामर्थ्यवानाला अधिक बलवान भेटतो.

श्रीच्या मागोमाग गर्व येतो

संपत्तीबरोबर गर्व येतो.

संग तसा रंग

संगती प्रमाणे वर्तन.