ओवी

माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर

पंढरीच्या मंदिराची ओवी.

माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई उभे इटेवर

टाय वाजे खनखन मुरदुंगाची धुन
तथे चाललं भजन गह्यरी गह्यरीसन

टायकर्‍यांचा जमाव दंगला दंगला
तुकारामाचा अभंग रंगला रंगला

तुम्ही करा रे भजन ऐका रे कीर्तन
नका होऊं रे राकेस सुद्ध ठेवा मन

आता सरला अभंग चालली पावली
जे जे इठ्ठल रखूमाई ईठाई माऊली

शेतामंदी गये घाम हाडं मोडीसनी
आतां घ्या रे हरीनाम टाया पीटीसनी

उभा भक्तीचा हा झेंडा हरीच्या नांवानं
हा झेंडा फडकावला झेंडूला बोवानं

आतां झाली परदक्षीना भूईले वंदन
हेचि दान देगा देवा आवरलं भजन

आतां फिरली आरती भजन गेलं सरी
बह्यना देवाचीया दारीं उभी क्षनभरी

पंढरीचे मंदिर अवघ्यांचे माहेर आहे. विठ्ठल आणि रखुमाई विटेवर उभे आहेत. टाळ खनकन वाजतो, मृदुंगाची धून आहे, भजन गहिवरले आहे. टाळकर्यांचा जमाव दंगलला आहे, आणि तुकारामाचा अभंग रंगला आहे. भजन करा, कीर्तन ऐका, रंक होऊ नका, मन सुद्ध ठेवा. अभंग सरला की पावली चालते. शेतात घाम गाळला, हाडे मोडली, आता हरीनाम टाळ्या वाजवून घ्या. भक्तीचा झेंडा हरीच्या नावाने फडकला. परिक्रमा झाली, भूमीला वंदन झाले. हेचि दान दे, भजन आवरले. आरती फिरली, भजन संपले. बहिणा देवाच्या दारी क्षणभर उभी आहे.

- बहिणाबाई चौधरी