ओवी

माझी माय सरसोती

सरस्वतीची ओवी.

माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!

माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता --भागवत
पावात समावत आणि मातीमधी उगवत !!

आरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक
हिरीदात सुर्याबापा दाये अरूपाच रूप !!

तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी
देवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी !!

फुलामधी समावला धरत्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय !!

किती रंगवशी रंग रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात !!

बहिणाबाई सरस्वतीला माय म्हणतात. ती बोली शिकवते, आणि बहिणाच्या मनात गुपित पेरते. पांडुरंगाची गीता आणि भागवत पावसात सामावते, आणि मातीत उगवते. देवाचे दर्शन आपोआप झाले. सूर्यबापाने अरूपाला रूप दिले. पायाची चाहूल पानापानात लागते, आणि येणजाण वारा कानात सांगतो. फुलात धरतीचा परमेश्वर सामावला आहे. नथ काय विचारणार. डोळ्यात रंग भरले, आणि शिरिरंग आभाळात खेळतो.

- बहिणाबाई चौधरी