येहेरीत दोन मोटा
दोन्हीमधी पाणी एक
आडोयाले कना, चाक
दोन्ही मध्ये गती एक
दोन्ही नाडा समदुर
दोन्हीमधी झीज एक
दोन्ही बैलांचं ओढणं
दोन्हीमधी ओढ एक
उतरणी चढणीचे
नाव दोन धाव एक
मोट हाकलतो एक
जीव पोसतो कितीक
विहिरीत दोन मोटा आहेत, पाणी एक आहे. दोन्ही बाजूला कणा आणि चाक आहे, गती एक आहे. दोन्ही दोर सारख्या लांबीचे आहेत, झीज एक आहे. दोन्ही बैलांचे ओढणे एक आहे. चढ आणि उतार ही दोन नावे आहेत, धाव एक आहे. मोट हाकणारा एक आहे, आणि त्या एका हाकेवर जीव पोसले जातात किती.
- बहिणाबाई चौधरी